Ad will apear here
Next
‘टाटा मोटर्स’मध्ये पगारवाढ
पिंपरी : टाटा मोटर्स व्यवस्थापन आणि टाटा मोटर्स एम्प्लॉइज युनियन यांच्यात मागील १९ महिन्यांपासून प्रलंबित असलेला त्रैवार्षिक वेतनवाढ करार अखेर मंगळवारी करण्यात आला. दरम्यानच्या काळात कामगारांनी केलेल्या आंदोलनानंतर मात्र अतिशय सौहार्दपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक पार पडली असल्याचे सांगण्यात आले आहे. सुमारे पाच हजार तीनशे कामगारांना या वेतनवाढीचा फायदा होणार आहे. 

एक सप्टेंबर २०१५ ते ३१ ऑगस्ट २०१८ या कालावधीकरिता ८६०० रुपये प्रत्यक्ष वाढही तीन वर्षांच्या टप्प्याटप्प्याने (७२ टक्के, १५ टक्के व १३ टक्के अशी) विभागून, तसेच ८७०० रुपये अप्रत्यक्ष म्हणजे एकूण रुपये १७ हजार ३०० रुपये एवढ्या रकमेचा करार झाला आहे. या व्यतिरिक्त एखादा कामगार कंपनीच्या सेवेत असताना मरण पावला, तर ग्रॅच्युइटीबाबत त्याची २५ वर्षे सेवा पूर्ण झाल्यावर देण्यात येणारे घड्याळ आता कामगाराच्या पती अथवा पत्नीसही देण्यात येईल. याबरोबरच कामगारांच्या इतरही अनेक सुविधांमध्ये वाढ करण्यात आली आहे. 

टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी अलीकडेच येथील पिंपरी प्रकल्पाला भेट दिली. नवनिर्वाचित अध्यक्ष चंद्रशेखरन हेदेखील या वेळी उपस्थित होते. या भेटीत त्यांनी कामगारांची प्रत्यक्ष भेट घेऊन या समस्येवर लवकरच काहीतरी मार्ग काढण्यासंदर्भात आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZYWOBA
Similar Posts
मुक्ता टिळक पुण्याच्या महापौर पुणे : पुणे महापालिकेच्या ५६व्या महापौर म्हणून मुक्ता टिळक यांच्या निवडीवर अखेर शिक्कामोर्तब झाले. बुधवारी (१५ मार्च) झालेल्या निवडणुकीत टिळक यांना ९८, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका नंदा लोणकर यांना ५२ मते मिळाली. पुणे महापालिकेच्या ६७ वर्षांच्या इतिहासात महापौरपदी विराजमान
आयर्नमॅन स्पर्धेत डॉ. अभय लुने यशस्वी पिंपरी : येथील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे नेत्ररोग शल्य चिकित्सक डॉ. अभय लुने यांनी नुकतीच झुरिच (स्वित्झर्लंड) येथे झालेली ‘आयर्नमॅन २०१९’ स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. ही स्पर्धा पूर्ण करणाऱ्या आठ भारतीयांमध्ये त्यांनी तिसरा क्रमांक मिळवला.
कुस्तीपटू उत्कर्ष काळे यांचा डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाकडून सन्मान पिंपरी : डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थीरोग व क्रीडा चिकित्सा विभागाच्यावतीने क्रीडा चिकित्सा विषयावर एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त व ‘कॉमनवेल्थ गेम्स २०१७’मधील सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू उत्कर्ष काळे यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी महाविद्यालयाचे ट्रस्टी कोषाध्यक्ष डॉ
महिला प्रवाशांसाठी विशेष सहा बसेस दाखल पुणे : महाराष्ट्र सरकारच्या तेजस्विनी योजनेअंतर्गत खास महिला प्रवाशांसाठी टाटा मोटर्स कंपनीने तयार केलेल्या अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज सहा अल्ट्रा नाईन एम डिझेल मिडी बसेस पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल)च्या ताफ्यात दाखल करण्यात आल्या आहेत. मार्च २०१९ पर्यंत टप्प्याटप्प्याने आणखी २७ बसेस दाखल होणार आहेत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language